Election Results : बिहारमध्ये विरोधकांचा धुव्वा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

बिहारमध्ये भाजप-जद(यू) आघाडीने 40 पैकी 38 जागांवर आघाडी मिळवित विरोधकांचा धुव्वा उडविला. राजदला केवळ दोन जागेवर किरकोळ आघाडी मिळाली आहे. कॉंग्रेस सर्व जागांवर मागे पडली आहे. 

पुणे - बिहारमध्ये भाजप-जद(यू) आघाडीने 40 पैकी 38 जागांवर आघाडी मिळवित विरोधकांचा धुव्वा उडविला. राजदला केवळ दोन जागेवर किरकोळ आघाडी मिळाली आहे. कॉंग्रेस सर्व जागांवर मागे पडली आहे. 

बेगुसराय मतदारसंघात केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी सीपीआयचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार यांच्यावर एक लाख 44 हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली. पाटनासाहिब मतदारसंघात केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी कॉंग्रेसचे उमेदवार शत्रुघ्नसिन्हा यांच्यावर 74 हजार मतांनी आघाडी मिळविली आहे. 

राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती या पाटलीपुत्र मतदारसंघात सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत, तर जहानाबाद मतदारसंघात राजदचे उमेदवार पुढे आहेत. मधेपुरा मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद यादव पिछाडीवर आहेत. 

बिहारमध्ये भाजप व जदयू प्रत्येकी 16 मतदारसंघात, तर त्यांचा मित्रपक्ष लोकजनशक्ती पक्ष सहा मतदारसंघात आघाडीवर आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही यंदा भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP-JD (U) alliance in Bihar leading