Loksabha 2019: कलम 370 रद्द करू : अमित शहा 

पीटीआय
Sunday, 12 May 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास जम्मू-काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे राज्यघटनेचे कलम 370 रद्द करू, असे आश्‍वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिले. येथील चंबा जिल्ह्यातील सभेत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

सिमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास जम्मू-काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे राज्यघटनेचे कलम 370 रद्द करू, असे आश्‍वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिले. येथील चंबा जिल्ह्यातील सभेत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना त्यांच्या राज्यासाठी वेगळा पंतप्रधान हवा आहे, तर कॉंग्रेसला लष्कराचा विशेषाधिकार काढून घेत देशद्रोहाचा कायदाही बोथट करायचा आहे. यावरून या दोन्ही पक्षांची मानसिकता स्पष्ट होत आहे. मात्र, भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येऊन मोदी पंतप्रधान झाल्यास आम्ही कलम 370 रद्द करू,'' असे शहा म्हणाले. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच भ्रष्टाचाराचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित झाला नाही, कारण भ्रष्टाचार देशातून हद्दपार झाला आहे, असा दावाही शहा यांनी केला. 

अमित शहा यांनी कॉंग्रेसला राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून लक्ष्य केले. "आपल्या जवानांची शीर कापले तरी तत्कालीन मनमोहनसिंग सरकारने काही केले नाही, मोदी सरकारच्या काळात मात्र बालाकोटवरच हल्ला करण्यात आला. सॅम पित्रोडा यांच्यासारख्या कॉंग्रेस नेत्यांना दहशतवाद्यांबरोबर चर्चा करायची आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP to scrap Article 370 if voted back to power says Amit Shah