मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ..! 

गुरुवार, 23 मे 2019

नवी दिल्ली : 'मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ..!' दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा पक्षाच्या मुख्यालयामध्ये विजयोत्सवासाठी दाखल झाले अन उपस्थितांनी फक्त मोदींच्याच नावाचा जयघोष केला.

लोकसभा निकाल 2019 :  नवी दिल्ली : 'मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ..!' दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा पक्षाच्या मुख्यालयामध्ये विजयोत्सवासाठी दाखल झाले अन उपस्थितांनी फक्त मोदींच्याच नावाचा जयघोष केला.. 

दुपारनंतर मतमोजणीचे कल स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या गोटात उत्साहाचे वारे संचारले. देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. सायंकाळी सातच्या सुमारास मोदी भाजपच्या मुख्यालयात दाखल झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी यावेळी होती. सायंकाळी दिल्लीत हलका पाऊस झाला. त्याचाही उल्लेख शहा आणि मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला.. 

शहा आणि मोदी या जोडगोळीने गेल्या पाच वर्षांमध्ये मेहनत घेत भाजपच्या जागा वाढविल्या. त्यामुळे राजकीय विश्‍लेषक आणि विरोधकांचे सर्व अंदाज आणि स्वप्नं उधळून लावत भाजपने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळविले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच कॉंग्रेसेतर सरकारला सलग दुसऱ्यांदा पूर्ण पाच वर्षांसाठी संधी मिळाली आहे. त्यातच, सलग दुसऱ्या निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत मिळविणारे मोदी हे तिसरेच पंतप्रधान आहेत. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी अशी कामगिरी करून दाखविली होती. 

निकाल पाहण्यासाठी क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP supporters celebrate victory with Modi Modi chants