Loksabha 2019 : निवडणूक अधिकारी म्हणाला दाबा 'ते' बटण

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 एप्रिल 2019

निवडणूक अधिकारी मोहद झुबैर हा अधिकारी सायकल चिन्हासमोरील बटण दाबण्यास महिला मतदारांना सांगत होता.

लखनौः लोकसभा निवडणूकीच्या मतदानादरम्यान निवडणूक अधिकारी महिला मतदारांना समाजवादी पक्षाच्या मतदारासाठी सायकल चिन्हासमोरील बटण दाबण्यास सांगत होता. याबद्दलची माहिती भाजपच्या नेत्यांना समजल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱयाला मारहाण केल्याची घटना आज (मंगळवार) घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरादाबादमधील बूथ क्रमांक 231 मध्ये येथे आज सकाळी मतदानाला सुरवात झाली होती. निवडणूक अधिकारी मोहद झुबैर हा अधिकारी सायकल चिन्हासमोरील बटण दाबण्यास महिला मतदारांना सांगत होता. याबद्दलची माहिती भाजप कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी झुबैरला रंगहाथ पकडून मारहाण केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला बाजूला नेले. झुबैरला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Workers Thrash UP Polling Officer For Asking Voters To Press Cycle