esakal | Loksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका

मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.

Loksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात चौकीदार चोर है अशी मोहीम उघडली होती. मध्यप्रदेश काँग्रेसकडून या अंतर्गत जाहीरात बनवण्यात आल्या होत्या. यात दोन ऑडीओ आणि 01 व्हिडीओ स्वरुपाच्या जाहीरातींचा समावेश होता. या जाहीरातींमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाना साधण्यात आला आहे. 

काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या जाहीरातींविरोधात मध्य प्रदेशातील भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. 16 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील भाजपाचे शिष्टमंडळांने निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. चौकीदार चोर है माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिमा मलिन करण्याचा काँग्रेसचा डाव आहे असं तक्रारीत म्हटलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने केलेल्या चौकशीनंतर निष्पन्न झालं की, सध्याच्या राजकारणात चौकीदार या शब्दाचा अर्थ भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला गेला आहे. राजकीय जाहीरात करताना कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक आरोप लावू शकत नाही या कारणाने निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या जाहीरातीवर बंदी आणली आहे.

loading image