Loksabha 2019: लालूंच्या स्वाक्षरीला जेडीयूचा विरोध 

वृत्तसंस्था
Saturday, 20 April 2019

सध्या शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या स्वाक्षरीने तिकिटे दिलेल्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी बिहारमधील संयुक्त जनता दलाकडून (जेडीयू) निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
 

पाटणा ः सध्या शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या स्वाक्षरीने तिकिटे दिलेल्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी बिहारमधील संयुक्त जनता दलाकडून (जेडीयू) निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

लालूप्रसाद यांनी त्यासाठी न्यायालयाकडून विशेष परवानगी घेतलेली नाही, असा जेडीयूचा आरोप आहे. जेडीयूचे प्रवक्ते नीरजकुमार यांनी ही तक्रार केली आहे.

लालूप्रसाद हे सध्या शिक्षा भोगत असून, त्यांच्यावर रांचीत उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू शकत नाहीत, असा दावा जेडीयूकडून करण्यात आला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint filed against Lalu Prasad Yadav for distributing tickets despite being in jail