Loksabha 2019 : प्रचारसभेत हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

व्यासपीठावर आलेल्या एकाने हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली.

अहमदाबाद (गुजरात)- पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांचे भाषण सुरू असाताना एकाने त्यांच्या कानशिलात लगावली. सुरेंद्रनगरच्या वाढवालमधील बालदना या गावात प्रचारसभेदरम्यान ही घटना घटली.

हार्दिक पटेल यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते गुजरातमधीलकाँग्रेस नेत्यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. काँग्रेस उमेदवारास निवडणूक देण्याचे आवाहन ते मतदारांना करत आहेत.

सुरेंद्र नगर येथे आज (शुक्रवार) सभा घेत असताना व्यासपीठावर आलेल्या एकाने हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडले व व्यासपीठावरच बेदम मारहाण केली. त्या व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाही. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, ती व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचा आरोप हार्दिक यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Hardik Patel slapped during a public meeting in Gujarat