Loksabha 2019: आक्रित घडतंय.. चक्क भाजप आणि डावे एकत्र येतायत!

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मे 2019

लोकसभेची निवडणुक अंतिम टप्प्यात असून पश्चिम बंगालमध्ये चक्क भाजप आणि डावे एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. डावे आणि भाजप यांची विचारधारा एकमेकांच्या कट्टर विरोधी आहे. परंतु, शत्रूचा शत्रू आपला मित्र याप्रमाणे, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या विरोधात डावे भाजपला छुप्या पद्धतीने मदत करताना दिसून येत आहेत. 

कोलकाता: लोकसभेची निवडणुक अंतिम टप्प्यात असून पश्चिम बंगालमध्ये चक्क भाजप आणि डावे एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. डावे आणि भाजप यांची विचारधारा एकमेकांच्या कट्टर विरोधी आहे. परंतु, शत्रूचा शत्रू आपला मित्र याप्रमाणे, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या विरोधात डावे भाजपला छुप्या पद्धतीने मदत करताना दिसून येत आहेत. 

भाजपला सत्ता कायम ठेवण्यासाठी पश्चिम बंगाल हे राज्य खूप महत्वाचे आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा असून राज्यात ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे, आधी तृणमूल काँग्रेस आणि डावे पक्ष हे पश्चिम बंगालमध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. पण, या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात थेट लढाई असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, डावे म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाला स्थानिक पातळीवर पूर्णपणे मदत करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाचा जेवढा विस्तार आहे तेवढा भाजपचा विस्तार नाही, म्हणूनच स्थानिक पातळीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते याठिकाणी भाजपचे काम करताना दिसून येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CPM cadres silently help BJP in fight against Mamata Banerjee