Loksabha 2019 : 'डुप्लिकेट' योगी आदित्यनाथ झाले व्हायरल...

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

अखिलेश यादव हे प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करत होते. परंतु, दोघांचे एकत्रित छायाचित्र पाहिल्यानंतर चर्चेला उधान आले.

लखनौः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अखिलेश यादव यांनी डुप्लिकेट योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले आहे.

अखिलेश यादव हे प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करत होते. परंतु, दोघांचे एकत्रित छायाचित्र पाहिल्यानंतर चर्चेला उधान आले. मात्र, खरे योगी आदित्यनाथ नसून त्यांचे डुप्लिकेट असल्याची माहिती समोर आल्यानंतर छायाचित्रावर नेटिझन्स व्यक्त होऊ लागले. अखिलेश यादव यांनी छायाचित्र ट्विट करताना म्हटले आहे की, 'आम्ही मुख्यमंत्री निवासस्थान सोडताच त्यांनी ते गंगेच्या पाण्याने धुतले. तेव्हाच आम्ही ठरवले होते, त्यांना पुरी खायला घालू.' अखिलेश यांनी छायाचित्र ट्विट केल्यानंतर चर्चेला उधाण आले होते.

योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे दिसणाऱ्या व अखिलेश यांच्यासोबत असणाऱ्या त्या व्यक्तीचे नाव सुरेश ठाकूर आहे. लखनौच्या केंट भागात ते राहतात. बौद्ध धर्माचे ते अनुयायी आहेत. ठाकूर योगींप्रमाणेच भगवे वस्त्र परिधान करतात, कानात बाळी घालतात. त्यांची वेशभूषा पूर्णपणे आदित्यनाथांसारखी आहे.

ठाकूर म्हणाले, 'माझा चेहरा योगी आदित्यनाथांसारखा दिसतो, त्याला मी काय करणार?, असा प्रश्न ठाकूर यांनी उपस्थित केला. 'मला पाहून लोकांना आनंद वाटतो, हे पाहून छान वाटते. मी कायम अशाच प्रकारची वस्त्रं परिधान करतो. भगव्या रंगाला लोकांनी हिंसेचे प्रतीक केले आहे. मात्र, मी अहिंसेचा पुरस्कार करतो. कारण मी बौद्ध धर्माचा अनुयायी आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: duplicate yogi adityanath and akhilesh yadavs plane photo goes viral