Election Results : सोशल नेटवर्किंगवर हॅशटॅग युद्ध

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर ट्रेंड आहे. निवडणुकांचे निकाल आणि त्यासंबंधीत ट्रेंड ट्विटरवर सुरु आहेत. याच ट्रेंडमध्ये #आ_रही_है_कांग्रेस आणि #GobackModi असे ट्रेंडही आहेत.

पुणे: लोकसभा निवडणूक निकालाचे चित्र काही तासांमध्ये स्पष्ट होणार असले तरी नेटझन्समध्ये हॅशटॅग युद्ध आज (बुधवार) सकाळपासून सुरू झाले आहे. सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर ट्रेंड आहे. निवडणुकांचे निकाल आणि त्यासंबंधीत ट्रेंड ट्विटरवर सुरु आहेत. याच ट्रेंडमध्ये #आ_रही_है_कांग्रेस आणि #GobackModi असे ट्रेंडही आहेत.

फेसबुक, ट्विटरबरोबरच इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवरही निवडणुकांच्या निकालाचीच चर्चा आहे. ट्विटरवरील सर्व टॉप ट्रेण्ड्स हे निवडणुकांच्या निकालासंदर्भातीलच आहेत. यामध्ये सर्वाधिक वापरला जाणारा हॅशटॅग आहे. #ElectionResults2019. #ElectionResults2019 हा हॅशटॅग भारतामध्ये ट्विटरवर टॉप ट्रेण्डिंग हॅशटॅग ठरला आहे. काही हजारांमध्ये ट्विटस करण्यात आले आहेत. शिवाय, #Verdict2019, #आ_रही_है_कांग्रेस, #ModiAaRahaHai, #CountingDay, #GobackModi हे हॅशटॅगही ट्रेण्ड येताना दिसत आहेत. सोशल नेटवर्किंगवर पहिला निकाल हाती येण्याआधीच समर्थकांनी आणि विरोधकांनी एकमेकांना लक्ष्य करत हॅशटॅग युद्ध सुरू केले आहे.

#GobackModi या हॅशटॅगअंतर्गत विविध मीम्स, ट्विट आणि उपरोधिक वक्तव्यांच्या माध्यमातून भाजपवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या काँग्रेसला समर्थकांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे, अब मंजिल दूर नही असे म्हणत काँग्रेसचाच विजय होणार असेही ट्विट केले जात आहे. ट्विटवर सुरु असणारे हे हॅशटॅगचे युद्ध पाहता आता निकालस्वरुपी विजयी मुद्रा कोणाच्या पारकड्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results top trend on twitter on election result day