Loksabha 2019 : 'दुसरं कोणतेही बटण दाबल्यास बसेल करंट'

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी लखमा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

कोरर (छत्तीसगड): मतदान करताना ईव्हीएमवरील पहिले बटन सोडून इतर कोणतेही बटन दाबले, तर तुम्हाला करंडट बसेल, असे छत्तीसगड सरकारमध्ये मंत्री असलेले कवासी लखमा यांनी कॅमेऱयासमोर म्हटले आहे. मतदारांना धमकी देऊन भीती घातल्याबद्दल निवडणूक आयोगाने लखमा यांना नोटीस बजावली आहे.

कनकेर मतदारसंघातील मतदारांना काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बिरेश ठाकूर यांना मतदान करण्याचे आवाहन करताना लखमा म्हणाले, 'बिरेश ठाकूर यांचे बटण पहिल्या क्रमांकाचे आहे. त्यामुळे पहिल्याच क्रमांकाचे बटण दाबा, जर दुसऱ्या क्रमांकाचे बटण दाबले तर तुम्हाला इलेक्ट्रीक करंट बसेल.'

भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी लखमा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाने लखमा यांना नोटीस बजावली असून, याप्रकरणी 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विक्रम उसेंडी यांनी लखमा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. 18 एप्रिल रोजी कनकेर मतदारसंघात मतदान होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electric Shock If You Press 2nd Or 3rd Button says Kawasi Lakhma