'पन्नास कोटी रुपये द्या, मोदींची हत्या करतो'

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मे 2019

दिल्ली पोलिस दलातील एका कॉन्स्टेबलने हा व्हिडिओ शूट केला होता. व्हिडिओ शुटिंग केल्याचे मला माहित नव्हते. संबंधित कॉन्स्टेबलने व्हिडिओशी छेडछाड करुन ते व्हायरल केले आहे.

नवी दिल्लीः मला पन्नास कोटी रुपये दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यास तयार आहे, असे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) बडतर्फ जवान तेजबहादूर यादव बोलत असल्याचा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्याबरोबरच पैशांची मागणी करण्यात आल्याचा दावा तेजबहादूर यादव यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून समाजवादी पक्षातर्फे रिंगणात उतरलेले सीमा सुरक्षा दलाचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी 2 मे रोजी फेटाळला होता. याविरोधात तेजबहादूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यादरम्यान तेजबहादूर यादव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तेजबहादूर यादव यांच्याशी एका व्यक्तीशी गप्पा मारताना दिसत आहे. 'मला पैसे द्या, मी मोदींची हत्या करण्यास तयार आहे. मला 50 कोटी रुपये द्या', असे तेजबहादूर यादव बोलताना दिसत आहेत.

तेजबहादूर म्हणाले, 'संबंधित व्हिडिओ हा 2017 मधील असून, दिल्ली पोलिस दलातील एका कॉन्स्टेबलने हा व्हिडिओ शूट केला होता. व्हिडिओ शुटिंग केल्याचे मला माहित नव्हते. संबंधित कॉन्स्टेबलने व्हिडिओशी छेडछाड करुन ते व्हायरल केले आहे. गेल्या आठवड्यात त्या कॉन्स्टेबलने माझ्याशी संपर्क साधून 30 लाख रुपयांची मागणी केली होती. अन्यथा हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.'

व्हिडिओमधील संभाषणः
तेज बहादुर यादव: मुझे पैसे दो और मैं मोदी को मार दूंगा।
दोस्त: तो तुम्हें मोदी को मारने में कोई दिक्कत नहीं है ?
तेज बहादुर यादव: मुझे दो 50 करोड़ रुपए
दोस्त: 50 करोड़ ? तुम्हें इतने पैसे भारत में तो मिलेंगे नहीं, हां लेकिन पाकिस्तान से मिल सकते हैं
तेज बहादुर यादव: नहीं मैं ऐसा काम नहीं करूंगा। मैं अपने देश के प्रति वफादार हूं। फिर पैसा मायने नहीं रखता
दोस्त: अरे मैंने तो इसलिए ये सवाल पूछा कि तुमने अभी कहा कि तुम 50 करोड़ रुपए के लिए मोदी को मार सकते हो
तेज बहादुर यादव: हां लेकिन अपने देश से गद्दारी नहीं कर सकता हूं। मैं मारने के लिए तैयार हूं अगर कोई भारतीय मुझे इतने रुपए दे।


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give me Rs 50 crore will kill Modi says Tej Bahadur Yadav in a sensational video