Loksabha 2019 : राजनाथ सिंह यांना काय बोलावे कळेनासे झाले (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 एप्रिल 2019

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांची चांगलीच कोंडी झाली. या कोंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाटणा: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांची चांगलीच कोंडी झाली. या कोंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राजनाथ सिंह हे पूर्णियात एनडीए उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले होते. पूर्णियाच्या धमदहा उच्च विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेला बुधवारी (ता. 10) राजनाथ सिंह संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती देत होते. आयुष्यमान भारत, कृषी सन्मान योजनेबद्दल ते बोलत होते. शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणाऱ्या 6 हजारांच्या मदतीबद्दल राजनाथ सिंह भरभरुन बोलले. तुम्हाला आता 2000 रुपयांचा पहिला हफ्ता मिळाला का?, असा प्रश्न राजनाथ सिंह यांनी विचारला. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी एका सूरात नाही असे उत्तर दिले. यामुळे त्यांना पुढे काय बोलावे हे समजेनासे झाले.

शेतकऱ्यांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे राजनाथ सिंह यांची कोंडी झाली. यानंतर पुन्हा त्यांनी कोणाच्या खात्यात तरी रक्कम झाली असेल ना?, असा प्रश्न केला. तेव्हा शेतकऱ्यांकडून प्रतिसादच आला नाही. त्यावर असे कसे होऊ शकते? कोणाला तरी लाभ मिळाला असेल? ज्यांना मिळाला, त्यांना आपले हात वर करा. ज्यांना लाभ मिळाला, त्यांनीच आपले हात वर करावेत, असं राजनाथ सिंह म्हणाले. एकाही शेतकऱ्याने हात वर केला नाही. त्यानंतर राजनाथ यांनी मंचावर बसलेल्या नेत्यांना योजनेचा लाभ का मिळाला नाही?, असा प्रश्न विचारण्यात आला. या संपूर्ण प्रकारामुळे राजनाथ यांची दोन्ही बाजूंनी कोंडी झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home miniter rajnath singh trolled by farmers in bihar rally over pradhan mantri kisan samman nidhi scheme