Loksabha 2019: पंतप्रधानपदासाठी प्रकाश आंबेडकरांकडून 'या' नेत्याला पसंती

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मे 2019

लोकसभा निवडणुकानंतर पंतप्रधान कोण होणार यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले आहे. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीनंतर एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान व्हावेत असे त्यांना वाटते.

मुंबई: लोकसभा निवडणुकानंतर पंतप्रधान कोण होणार यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले आहे. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीनंतर एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान व्हावेत असे त्यांना वाटते.

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार यावर अनेक राजकीय नेते अंदाज व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती या पंतप्रधानपदाच्या उमेदवार असल्याचे म्हटले होते. निवडणुकीनंतर पवार देखील पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरू शकतील असे बोलले जाते. यावर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना मी पंतप्रधानपदाच्या लायक मानत नाही असेही म्हटले आहे.

आंबेडकर पुढे म्हणाले की, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि के चंद्राबाबू नायडू हे कधीच पंतप्रधान होणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांपैकी कोणीही पंतप्रधान होणार नसल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. सोबतच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या 50 जागा कमी होणार असल्याचे भाकितही त्यांनी केले आहे. यंदाच्या निकालात भाजपला 148 ते 200 जागा मिळतील, तर काँग्रेसला 100पर्यंत जागा मिळतील असे आंबेडकर म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Like to HD devegowda is next PM says Prakash Ambedkar