Loksabha 2019: नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रियांका गांधी लढणार?

वृत्तसंस्था
रविवार, 21 एप्रिल 2019

- अध्यक्षांनी मला सांगितले तर वाराणसीतून निवडणूक लढवण्यास तयार
- काँग्रेस चिटणीस प्रियांका गांधी यांचे वक्तव्य
- पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रियांका गांधी निवडणूक लढणार या चर्चेला उधाण

वाराणसी: वायनाड दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस चिटणीस प्रियांका गांधी यांना पत्रकारांनी वाराणसीतून निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला. यावर प्रियांका म्हणाल्या, काँग्रेस अध्यक्षांनी मला सांगितले तर वाराणसीतून निवडणूक लढवण्यास मला आवडेल. यामुळे पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रियांका गांधी निवडणूक लढणार या चर्चेला उधाण आले आहे.

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. या मतदारसंघातून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते आणि काही नेते करत आहे, यावरूनच आज पत्रकारांनी प्रियांका गांधी यांना प्रश्न विचारला होता. 

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान व्ही.व्ही वसंत कुमार यांच्या कुटुंबीयांची प्रियांका गांधी यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाराणसी येथील उमेदवारीवरून वरील वक्तव्य केले. काँग्रेसचा मात्र अद्याप वाराणसीबाबत निर्णय झालेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I will be happy to contest from Varanasi if asked by Congress president says Priyanka Gandhi