Loksabha 2019 : मी, बंगालमध्ये जातो, पाहुया काय होतं तेः मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्यासभेदरम्यान गोंधळ घातला. मात्र, आज मी पुन्हा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहे. पाहुया काय होते ते.

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्ते व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. पश्चिम बंगालमध्ये मी पुन्हा जात असून, पाहूया काय होते ते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार लढाई सुरू आहे. कोलकाता येथे अमित शहा यांच्या रोड शोनंतर भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होऊन तिचे रुपांतर हिंसाचारात झाले होते. यावेळी मोठी जाळपोळ झाली होती. यावेळी समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीचीही मोडतोड झाली होती. या घटनेनंतर अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांनी हे घडवून आणल्याचा आरोप केला होता.

उत्तर प्रदेशमधील मऊ येथे प्रचारसभेदरम्यान बोलताना मोदी म्हणाले, मिदनापूर येथे काही महिन्यांपूर्वी माझ्या सभेदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मला माझे भाषण थांबवावे लागले होते. आता तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्यासभेदरम्यान गोंधळ घातला. मात्र, आज मी पुन्हा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहे. पाहुया काय होते ते.'

दरम्यान, अमित शहा यांच्या कोलकाता येथे झालेल्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारावेळी मोडतोड झालेल्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची नव्याने स्थापना करण्यात येईल, असेही मोदी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I will go to Bengal again see what happens says narendra modi