Loksabha 2019 : प्रियांका गांधी तर चोराची पत्नी: उमा भारती

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

प्रियांका गांधी तर चोराच्या पत्नी आहेत. त्यांच्या पतीवर चोरीचा आरोप आहे. यामुळे संपूर्ण देश त्यांना याच नजरेने पाहणार.

दुर्ग (भोपाळ): केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

दुर्ग येथे प्रचारासाठी गेलेल्या उमा भारती यांना प्रसारमाध्यमांनी प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील सहभागाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, 'प्रियांका गांधी तर चोराच्या पत्नी आहेत. त्यांच्या पतीवर चोरीचा आरोप आहे. यामुळे संपूर्ण देश त्यांना याच नजरेने पाहणार.'

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी बहुजन पार्टीच्या प्रमुख मायावती, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, समाजवादवादी पार्टीचे नेते आझम खान आणि भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करताना प्रचारबंधी घातली आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतरही बाकीच्या राजकीय नेत्यांवर काही परिणाम होताना दिसत नाही. कारण, केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस पक्षामध्ये गंभीरपणे विचार चालू आहे. यावर बोलताना उमा भारती म्हणाल्या, 'भारतात लोकशाही आहे. त्यामुळे कोणताही इच्छुक उमेदवार कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवू शकतो.'

Web Title: India will recognise Priyanka Gandhi as a Chor Ki Patni Says Uma Bharti