Election Results : देशातील 'या' दिग्गज नेत्यांचा विजय

political party flags
political party flags

मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वायनाडमध्ये विजय मिळाला आहे, मात्र बालेकिल्ला अमेठीमध्ये पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे.

विजयी उमेदवार

  • नरेंद्र मोदी (भाजप) - वाराणसी, उत्तर प्रदेश
  • अमित शाह  (भाजप) - गांधीनगर, गुजरात
  • राहुल गांधी (काँग्रेस) - वायनाड, केरळ
  • आझम खान (सपा) - रामपूर, उत्तर प्रदेश - जयाप्रदा (भाजप) पराभूत
  • अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस) - डायमंड हार्बर, पश्चिम बंगाल
  • अनुराग ठाकूर (भाजप) - हमीरपूर, हिमाचल प्रदेश
  • फारुक अब्दुल्ला (जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स) - श्रीनगर, जम्मू-काश्मीर

आघाडीवर असलेले उमेदवार

  • सोनिया गांधी (काँग्रेस) - रायबरेली, उत्तर प्रदेश
  • असदुद्दीन ओवेसी (एमआयएम) - हैदराबाद, तेलंगणा
  • सनी देओल (भाजप) - गुरुदासपूर, पंजाब
  • किरण खेर (भाजप) - चंदिगढ, पंजाब
  • गौतम गंभीर (भाजप) - पूर्व दिल्ली
  • किरेन रीजीजू (भाजप) - अरुणाचल पश्चिम
  • जयंत सिन्हा (भाजप) - हजारीबाग, झारखंड
  • प्रज्ञासिंह ठाकूर (भाजप) - भोपाळ, मध्य प्रदेश
  • शशी थरुर (काँग्रेस) - तिरुअनंतपुरम, केरळ

आघाडी-पिछाडी

  • अमेठी, उत्तर प्रदेश - स्मृती इराणी (भाजप) आघाडीवर, राहुल गांधी (काँग्रेस) पिछाडीवर
  • पाटणासाहिब, बिहार - रवीशंकर प्रसाद (भाजप) आघाडीवर, शत्रुघ्न सिन्हा (काँग्रेस) पिछाडीवर
  • आझमगड, उत्तर प्रदेश - अखिलेश यादव (सपा) आघाडीवर, निरहुआ/दिनेश लाल यादव (भाजप) पिछाडीवर
  • आसनसोल, पश्चिम बंगाल - बाबुल सुप्रियो (भाजप) आघाडीवर, मूनमून सेन (तृणमूल काँग्रेस) पिछाडीवर

पिछाडीवर

  • ज्योतिरादित्य शिंदे (काँग्रेस) - गुणा, मध्य प्रदेश
  • जयंत चौधरी (रालोद) - बागपत, उत्तर प्रदेश
  • कन्हैयाकुमार - बिहार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com