Loksabha 2019 : नरेंद्र मोदींनी सांगितली ‘दोस्ती’ तुटण्याची तारीख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर अकाउंटवर उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या दोस्तीबद्दल टीका करताना, ‘ही बनावट दोस्ती येत्या २३ मे रोजी तुटेल, इकडे मोदी सरकार दुसऱ्यांदा बनेल आणि तिकडे ही दोस्ती संपेल,’ असे म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटला चांगलाच प्रतिसाद मिळाला, त्यावर टीकाही झाली.​

सोशल मीडियात निवडणुकीचा प्रचार आणि नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरूच असतात, पण आज श्रीलंकेतील स्फोटाने वेगळाच सूर होता. अनेक नेत्यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला, त्याचबरोबर दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त केली.

दुपारपर्यंतच्या बऱ्याच पोस्ट तशा होत्या, पण त्यानंतरच्या पोस्टमध्ये मात्र मग आपल्या इथल्या निवडणुकीचे वारे पुन्हा वाहू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर अकाउंटवर उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या दोस्तीबद्दल टीका करताना, ‘ही बनावट दोस्ती येत्या २३ मे रोजी तुटेल, इकडे मोदी सरकार दुसऱ्यांदा बनेल आणि तिकडे ही दोस्ती संपेल,’ असे म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटला चांगलाच प्रतिसाद मिळाला, त्यावर टीकाही झाली. मोदी यांचा ट्विटरवरून जोरात प्रचार सुरू असताना त्यांना उत्तर मिळते ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याकडून. तेजस्वी यादव यांना आता साथ आहे ती राबडीदेवी आणि शरद यादव यांची. लालूप्रसाद यादव यांना तुरुंगात काही तरी होईल, अशी तक्रार हे दोघेही (शरद यादव आणि राबडीदेवी) आपापल्या ट्विटर अकाउंटवरून आवर्जून करीत आहेत. तेजस्वी यादव तर सतत मोदी सरकारवर दडपशाहीचा आरोप करीत आहेतच. बघेल यांनी छत्तीसगड सरकारबाबत केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याचा आरोप करून छत्तीसगड पाकिस्तानात आहे का, असा बोचरा सवाल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi SP BSP Friendship Politics