Loksabha 2019 : पंजाबमध्ये रिंगणात बर्गरवाले, मॅगीवाला

पीटीआय
गुरुवार, 9 मे 2019

लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमधून २८७ उमेदवार उभे असले, तरी त्यातील दोघांनी त्यांच्या वेगळेपणामुळे मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक आहेत ‘बर्गरवाले’ आणि दुसरे आहेत ‘मॅगीवाला’. पंजाबमध्ये १९ मे रोजी मतदान होईल.

चंडीगड - लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमधून २८७ उमेदवार उभे असले, तरी त्यातील दोघांनी त्यांच्या वेगळेपणामुळे मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक आहेत ‘बर्गरवाले’ आणि दुसरे आहेत ‘मॅगीवाला’. पंजाबमध्ये १९ मे रोजी मतदान होईल.

‘बाबाजी बर्गरवाले’ या दुकानामुळे लुधियाना मतदारसंघातील रविंदरपाल सिंग प्रसिद्ध आहेत, तर पतियाळातील जसबीरसिंग हे ‘चाचा मॅगीवाला’ या दुकानामुळे प्रसिद्ध आहेत. हे दोघेही अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत.

प्रदूषित पाणी आणि त्यातील घातक रसायनांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढ
त असून, त्याविरुद्ध जनजागृती करण्यासाठी मी निवडणूक लढवीत असल्याचे रवींदरपाल सिंग सांगतात. सरकारी रुग्णालये आणि शाळांची स्थिती सुधारण्याचाही माझा प्रयत्न असल्याचे ते सांगतात. त्यांचे दुकान गेली बारा वर्षे ग्राहकांना कुरकुरीत बर्गर खायला देऊन तृप्त करीत आहे. निवडणुकीसाठी मी माझ्या बचतीतला पैसा वापरत असल्याचे ते आवर्जून सांगतात. लुधियानात काँग्रेसने सिमरजितसिंग बैन्स यांना, तर शिरोमणी अकाली दलाने महेशिंदरसिंग ग्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे.

पंजाबमधील भ्रष्टाचार आणि गरिबांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी मी पतियाळातून उभा असल्याचे ‘चाचा मॅगीवाला’चे जसबीरसिंग सांगतात. २०१७ ची विधानसभा निवडणूकही त्यांनी लढविली; पण ते पराभूत झाले. या मतदारसंघातून काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री प्रेणित कौर यांना, तर अकाली दलाने सुरजितसिंग रखारा यांना उमेदवारी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Punjab Burger Maggie Sailer Candidate Politics