Election Results : राहुल गांधींसह काँग्रेसचे 'हे' दिग्गज नेते पिछाडीवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती येत असून काँग्रेसचे महत्त्वाचे नेते पिछाडीवर असल्याचे चित्र सध्या तरी आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच पिछाडीवर असून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून भाजपच्या स्मृती इराणी यांनी आघाडी घेतली आहे.​

लोकसभा निकाल 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती येत असून काँग्रेसचे महत्त्वाचे नेते पिछाडीवर असल्याचे चित्र सध्या तरी आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच पिछाडीवर असून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून भाजपच्या स्मृती इराणी यांनी आघाडी घेतली आहे.

सोबतच, फतेपूर सिकरी मतदारसंघातून राज बबर हेही पिछाडीवर आहेत. केरळमधील तिरुवनंतपूरममधून शशी थरुर हेही पिछाडीवर असून पंजाबमधील आनंतपूर साहिबा मतदारसंघातून मनिष तिवारी, रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी, कर्नाटकमधील गुलबर्गा येथून मल्लिकाअर्जून खर्गे, महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण हे महत्वाचे नेते पिछाडीवर आहेत.

सोबतच, महाराष्ट्रात सोलापूरात सुशिलकुमार शिंदे, नागपूरमधून नाना पटोले हेसुद्धा पिछाडीवर असल्याचे चित्र सध्या आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Main leaders from congress trailing in Loksabha 2019