Loksabha 2019 : दीदींची थप्पड माझ्यासाठी आशीर्वादः नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मे 2019

लोकसभा निवडणुकीतील 'वर्ड वॉर' आणखीच पेटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

पुरलिया : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (दीदी) यांनी थप्पल लगावली तरी ती माझ्यासाठी आशीर्वाद असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंश्चिम बंगालमधील बंकुरा येथे प्रचारसभेत बॅनर्जी यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, 'मला सांगितले गेले की दीदींना मोदींना थप्पड मारायची आहे. ममता दीदी, मी तर तुम्हाला दीदी म्हणतो. तुमचा आदर करतो. तुम्ही थप्पड मारली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल. तेही सहन करेन.'

बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, 'तृणमूल काँग्रेसवर खंडणीचे पैसे वापरल्याचा हीन आरोप मोदींनी केला आहे. त्यांच्या या आरोपाबद्दल त्यांना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते. मोदी आणि अमित शहा हे दुर्योधन आणि दुःशासनासारखे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा बंगालमध्ये आले तेव्हा त्यांनी माझ्यावर खंडणीखोर असल्याचा आरोप केला होता. आमचा पक्ष खंडणीच्या पैशावर चालत नाही. आमचा पक्ष माझ्या विकल्या जाणाऱ्या चित्रांच्या, पुस्तकांच्या आणि इतर कामांच्या उत्पन्नावर चालतो. आम्ही खंडणीखोर नाही; मात्र मोदी आमच्यावर असे खोटे आरोप लावत आहेत.'

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील 'वर्ड वॉर' आणखीच पेटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mamata banerjee your slap will be blessing for me says narendra modi