Loksabha 2019: मेहबूबा मुफ्तींच्या ताफ्यावर दगडफेक

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि "पीडीपी'च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या वाहनांच्या ताफ्यावर आज अनंतनाग जिल्ह्यात दगडफेक करण्यात आली.
 

श्रीनगर ः जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि "पीडीपी'च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या वाहनांच्या ताफ्यावर आज अनंतनाग जिल्ह्यात दगडफेक करण्यात आली.

खिर्रम येथील दर्ग्याला भेट देऊन परतत असताना ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत मुफ्ती यांच्या वाहनांच्या ताफ्यातील एका गाडीचे नुकसान झाले असून, चालक जखमी झाला आहे.

मुफ्ती यांना कुठलीही इजा झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुफ्ती या अनंतनाग मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. याच मतदारसंघात 2014 मध्ये त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय संपादन केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mehbooba Muftis convoy attacked on way to Khiram