Loksabha 2019 : गेहलोत यांचे राष्ट्रपती कोविंद यांच्याविषयी वादग्रस्त विधान

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

- अशोक गेहलोत यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याविषयी वादग्रस्त विधान
- जातीय समीकरण जुळवण्यासाठी कोविंद यांना राष्ट्रपती बनविण्यात आल्याचा भाजपवर आरोप 
- लालकृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रपती पदावर विराजमान होता आले नाही, अशीही टीका 

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. जातीय समीकरण जुळवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनविण्यात आले होते. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रपती पदावर विराजमान होता आले नाही, अशी टीका अशोक गेहलोत यांनी भाजप सरकारवर केली आहे.

अशोक गेहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात अशोक गहलोत यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुजरातच्या निवडणुका येत होत्या. गुजरातमध्ये आपले सरकार बनत नाही, त्यामुळे भाजप घाबरले होते. मला असे वाटते की, रामनाथ कोविंद यांना जातीय समीकरण जुळवण्यासाठी राष्ट्रपती बनविले आणि लालकृष्ण आडवाणी यापासून सुटले. असे अशोक गहलोत यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi govt made Kovind president because of his caste says Ashok Gehlot