ढसाढसा रडणाऱया उमेदवाराची खरी माहिती वेगळीच

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मे 2019

आपल्याला किती मतं मिळाली ते पाहण्यासाठी ते मतमोजणी केंद्रावर गेले. जोरदार प्रचार केल्यामुळे आपल्याला मोठे मतदान होईल, अशी अपेक्षा होती. मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर त्यांना पाच मतं मिळाल्याचे समजल्यानंतर ते ढसाढसा रडायला लागले.

जालंधर : घरात नऊ सदस्यांनी मतदान केले असतानाही, केवळ पाच मतं पडल्यामुळे ढसाढसा रडणाऱ्या उमेदवाराबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. केवळच पाचच नव्हे तर त्यांला 856 मतं मिळाली आहेत. परंतु, पाच मतं मिळाल्याचे सांगतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार म्हणून नीतू वाला निवडणूकीच्या रिंगणात उभे राहिले होते. नीतू वाला यांच्या कुटुंबातील नऊ सदस्यांनी मतदान केले होते. आपल्याला किती मतं मिळाली ते पाहण्यासाठी ते मतमोजणी केंद्रावर गेले. जोरदार प्रचार केल्यामुळे आपल्याला मोठे मतदान होईल, अशी अपेक्षा नीतू यांच्या मनात होती. मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर त्यांना पाच मतं मिळाल्याचे समजल्यानंतर ते ढसाढसा रडायला लागले. केवळ पाचच मतं मिळाल्याचे समजून हताश झालेल्या नीतू वाला यांना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हा मुद्दा धरुन प्रश्न विचारला होता. त्यावेळी कुटुंबीयांनी आपल्यासोबत गद्दारी केल्याची भावना बोलून दाखवत असतानाच रडत होते. कुटुंबीयांना दोष देतानाच त्यांनी ईव्हीएमवरही खापर फोडले. नीतू यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

नीतू वाला यांना प्रत्यक्षात 856 मतं मिळाल्याचं आकडेवारीतून समोर आले असून, कदाचित प्राथमिक फेरीतील हे कल समजल्यानंतर त्यांनी घाईघाईतच प्रतिक्रिया नोंदवली असावी, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. जालंधर (पंजाब) लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संतोकसिंग चौधरी विजयी झाले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nine people in my family but i got just five vote candidate cry video viral