Loksabha 2019 : वाराणसीत नरेंद्र मोदी यांच्याविरोधात 101 उमेदवार!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 April 2019

  • वाराणसीत पंतप्रधानांसमोर 101 उमेदवारांचे आव्हान?
  • उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक आयोग घेईल निर्णय
  • शेतकऱ्यांनीही भरले लोकसभा उमेदवारी अर्ज

लोकसभा 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उमेदवारी असलेल्या वाराणसी येथे या निवडणूकीला एक आश्चर्यजनक सामना बघायला मिळत आहे. 29 एप्रिल ला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकुण 102 उमेदवारांनी आपले अर्ज भरले. ज्यात नरेंद्र मोदींच्या नावाचाही समावेश आहे. 

उमेदवारांची ही भली मोठी यादी बघून जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी तर डोक्यावरच हात ठेवला. त्यामुळे जर नाव परत घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत ही संख्या 64 पर्यंत पोहोचली नाही तर नाईलाजाने निवडणूक आयोगाला मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया करावी लागेल. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ज्या लोकांनी अर्ज भरलेत, त्यात प्रामुख्याने युती उमेदवार आणि बीएसएफ जवान तेज बहादुर यादव, काँग्रेसचे उमेदवार अजय राय, सपाच्या शालिनी यादव, हॉकी खेळाडू व पद्मश्री मो. शाहिद यांची मुलगी हिना यांची नावे आहेत. अपक्ष उमेदवार अतीक अहमद याशिवाय तेलंगना येथून आलेले हल्दी किसानचे प्रतिनिधी कुंटा गंगाराम मोहन रेड्डी यांच्यासह काही शेतकऱ्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करत वाराणसीच्या राजकारणाचे तापमान वाढविले आहे.

शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुहेलदेव भारतीय समाज पार्टी सुरेंद्र, रामराज्य परिषद श्रीभगवान पाठक, राष्ट्रीय बंधुत्व पार्टी येथून जम्मू चे छज्जू राम गुप्ता, फिरोजाबाद च्या प्रीति मिश्रा, भारती इंसाफवादी पार्टीचे मिर्जापुरचे जय प्रकाश, लोकप्रिय समाज पार्टीचे रोहनियाचे छेदीलाल सह एकुण 71 जणांच्या नावांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over Hundred candidates against Narendra Modi in Varanasi for Loksabha election 2019