पिवळ्या साडीवालीनंतर आता निळ्या ड्रेसवालीची धूम

रविवार, 12 मे 2019

पिवळ्या साडीमध्ये महिला निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन जातानाचे काही फोटो वायरल झाले होते. हे फोटो पाहून ती महिला कोण आहे? याचीच चर्चा सर्वांत रंगल्यानंतर आता निळ्या ड्रेसमधील ईव्हीएम मशीन घेऊन जातानाचे महिला अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मिडियावर सध्या निळ्या ड्रेसवरील महिलेचे फोटो व्हायरल होत असून जोरदार चर्चा चालू आहे.

नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्यातील मतदान आज (रविवार) होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. असे असताना सोशल मीडियावर निवडणुकीपेक्षा दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष लागलंय.

पिवळ्या साडीमध्ये महिला निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन जातानाचे काही फोटो वायरल झाले होते. हे फोटो पाहून ती महिला कोण आहे? याचीच चर्चा सर्वांत रंगल्यानंतर आता निळ्या ड्रेसमधील ईव्हीएम मशीन घेऊन जातानाचे महिला अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मिडियावर सध्या निळ्या ड्रेसवरील महिलेचे फोटो व्हायरल होत असून जोरदार चर्चा चालू आहे.

निळ्या वनपीस ड्रेसमधील ही महिला अधिकारी मध्यप्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील गोविंदपुरा विधानसभा मतदारसंघातील एका बूथवर ड्युटीला असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिला अधिकाऱ्याच्या हातात असलेल्या ईव्हीएम मशिनवर गोविंदपुरा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक लिहला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याआधी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या एका पिवळ्या साडीतील महिला अधिकाऱ्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

पिवळ्या साडीतील ही महिला अधिकारी लखनऊ येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होती, तिचे नाव रीना द्व‍िवेदी आहे. पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये ही निवडणूक अधिकारी महिला द्विवेदी यांच्या मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाले असेल, याबाबतचे पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: polling officer woman in blue dress photo goes viral