Loksabha 2019: बंगालमधील हिंसाचारामागे ममता बॅनर्जी: जावडेकर 

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मे 2019

तृणमूल कॉंग्रेस पक्ष मतदारांवर उघड हिंसाचार करीत असल्याचा आरोप करीत बराकपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची मागणी भाजपने केली. या हिंसाचारामागे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

नवी दिल्ली: पश्‍चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस पक्ष मतदारांवर उघड हिंसाचार करीत असल्याचा आरोप करीत बराकपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची मागणी भाजपने सोमवारी केली. या हिंसाचारामागे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे आज पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असताना तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बराकपूरमधील मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने जावडेकर यांनी टीका केली.

"तृणमूल'च्या गुंडांनी हिंसाचार आणि धमक्‍या देऊन मतदारांना भाजपला मतदान करू दिले नाही. मते मिळवून निवडून येऊ शकत नसल्याने तृणमूल कॉंग्रेसने गैरमार्गाचा अवलंब केला आहे. म्हणून संपूर्ण बराकपूर मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी, अशी आमची मागणी असल्याचे जावडेकर म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Praksah javdekar targets mamta banerjee Over barakpur Violence