Loksabha 2019 : राहुल गांधी, कुमारस्वामी हे 'जोकर'; भाजप आमदार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

राहुल गांधी आणि कुमारस्वामी ज्या पद्धतीने बोलतात, विचार आणि देहबोलीवरून ते दुसऱ्यांच्या थट्टेचा विषय होतात.

हुबळी (कर्नाटक) : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व कनार्टकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वारी हे जोकर आहेत. परंतु, 'हिरो' कोण आणि 'जोकर' कोण हे मतदार ठरवतील, असे कर्नाटकचे भारतीय जनता पक्षाचे आमदार बसवराज बोम्मई यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे.

प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना बोम्मई म्हणाले, 'राहुल गांधी आणि कुमारस्वामी ज्या पद्धतीने बोलतात, विचार आणि देहबोलीवरून ते दुसऱ्यांच्या थट्टेचा विषय होतात. यामुळे जनताच ठरवेल की कोण 'हिरो' आणि कोण 'जोकर' असेल. कर्नाटकमध्ये काँग्रेस इंग्रजांसारखाच फोडा आणि राज्य करा हे धोरण लिंगायत समाजाच्या प्रश्नांवर वापरत आहे. लिंगायत समाजाला काँग्रेस निवडणुकीसाठी वापरत आहे. यात अपयश आले म्हणून त्यांच्याच नेत्यांकडून वेगवेगळी विधाने वदवून घेत आहे. डी के शिवकुमार हे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा अधिकार देण्याची चूक केल्याची माफी मागत आहेत, तर एम बी पाटील ही माफी धुडकावत असून, पुढील काळात हा विषय लावून धरण्याचे सांगत आहेत. काँग्रेसने आधी पक्षातील नेत्यांमध्येच ठरवावे त्यांना लिंगायत समाजाबाबत काय भुमिका घ्यायची आहे.'

दरम्यान, कर्नाटकमध्ये लोकसभेच्या 28 जागा असून, गुरुवारी (ता. 18) निम्म्या जागांवर मतदान झाले. उर्वरित 14 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi and Kumaraswamy is Joker says BJP MLA Basavaraj Bommai