Loksabha 2019 : काँग्रेसशी आघाडीशिवाय सप-बसपला पर्याय नाही : सलमान खुर्शिद

पीटीआय
सोमवार, 22 एप्रिल 2019

निवडणुकीनंतर कॉंग्रेसशी आघाडी करण्याशिवाय सप-बसपला पर्याय नाही, असे वक्तव्य कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी आज येथे केले.

कैमगंज (पीटीआय) : निवडणुकीनंतर कॉंग्रेसशी आघाडी करण्याशिवाय सप-बसपला पर्याय नाही, असे वक्तव्य कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी आज येथे केले.

उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविलेले खुर्शिद यांनी म्हटले आहे की, भाजप सरकारच्या कारभारावर नागरिक नाराज असून, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर त्यांना आता नवा पर्याय हवा आहे. त्यामुळे "गठबंधन'मध्ये सहभागी झालेल्या पक्षांसोबत आघाडी करण्यास कॉंग्रेसही उत्सुक आहे. निवडणुकीनंतरही आम्ही एकत्रितपणे भाजपला विरोध करणार आहोत. 

कैमगंज येथील निवासस्थानी "पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुर्शिद यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की निवडणुकीनंतर समाजवादी पक्ष (सप) आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसप) "गठबंधन'ला कॉंग्रेसशी आघाडी केल्याशिवाय पर्याय असणार नाही. त्यामुळे सप-बसपबरोबर निवडणुकीनंतर आघाडी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भाजपला सत्तेतून घालविण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे सप-बसप आघाडी मतदारांना सांगते आहे. त्यामुळे या आघाडीला कॉंग्रेसबरोबर जावेच लागणार आहे. आमच्या सर्वांचे अंतिम धैय एकच आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SP BSP has no option without Congress says Salman Khurshid