LokSabha 2019 : कडक उन्हातही मतदार घराबाहेर; देशभरात 51 टक्के मतदान

वृत्तसंस्था
Tuesday, 23 April 2019

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज (ता.23) सकाळी सुरवात झाली. दुपारी तीन पर्यंत देशभरात एकूण 51.16 % मतदान झाले आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत असून अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा निर्णय आज मतयंत्रात बंद होणार आहे.

नवी दिल्ली: लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज (ता.23) सकाळी सुरवात झाली. दुपारी तीन पर्यंत देशभरात एकूण 51.16 % मतदान झाले आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत असून अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा निर्णय आज मतयंत्रात बंद होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात 13 राज्यात आणि 02 केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण 116 जागांवर मतदान होत आहे. 116 जागांसाठी 1640 उमेदवार रिंगणात उतरले असून एकूण 18.85 कोटी मतदार 1640 उमेदारांपैकी कोणत्या 116 उमेदवारांना निवडून द्यायचे याचा निर्णय घेतील. हे मतदान एकूण 2.10 लाख मतदान केंद्रांवर होत आहे. 

देशभरात एकूण मतदानाला मतदारांचा चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. आसाममध्ये दुपारी तीनपर्यंत 62.13%; बिहार 46.94%; गोवा 58.54%; गुजरात 50.36%; जम्मू-काश्मीर 10.64%; कर्नाटक 49.96%; केरळ 55.02%; महाराष्ट्र 44.70%; ओडिशा 46.29%; त्रिपुरा 61.21%; उत्तर प्रदेश 46.99%; पश्चिम बंगाल 67.52% तर छत्तीसगडमध्ये 55.28% मतदान झाले. या राज्यासह दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशात दुपारी तीनपर्यंत अनुक्रमे 56.81% आणि 55.02% एवढे मतदान झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Third Phase india witnesses 51 percent voting for Loksabha 2019