Election Results : वायएसआर आंध्रप्रदेशचा हिरो; मोदी आणि चंद्राबाबू दोघेही झिरो!

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी जोरदार यश मिळवलं आहे. त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या चंद्राबाबू नायडू यांचा पराभव करत मुसंडी मारली. जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. रेड्डींच्या वाएसआर काँग्रेसने आंध्रातील लोकसभेच्या एकूण 25 जागांपैकी 24 जागांवर आघाडी मिळवली आहे तर, विधानसभेच्या 175 पैकी 151 जागांवर आघाडी घेतली आहे.

हैद्राबाद : आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी जोरदार यश मिळवलं आहे. त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या चंद्राबाबू नायडू यांचा पराभव करत मुसंडी मारली. जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. रेड्डींच्या वाएसआर काँग्रेसने आंध्रातील लोकसभेच्या एकूण 25 जागांपैकी 24 जागांवर आघाडी मिळवली आहे तर, विधानसभेच्या 175 पैकी 151 जागांवर आघाडी घेतली आहे.

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी जोरदार यश मिळवलं आहे. जगनमोहन रेड्डींनी आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या चंद्राबाबू नायडू यांचा पराभव करत मुसंडी मारली. त्यांनी लोकसभा आणि विधानसभेसाठी पदयात्रा काढून जंगी तयारी केली होती. त्यांची तब्बल 430 दिवसांची प्रजा संकल्प पदयात्रा या निवडणुकांमध्ये खूपच गाजली. 

आपल्या कडापा जिल्ह्यातून त्यांनी या पदयात्रेची सुरुवात केली आणि ते 13 जिल्ह्यांमध्ये 125 विधानसभा मतदारसंघात फिरले. ''रावळी जगन, कावळी जगन अशी त्यांची घोषणा होती. जगनमोहन निवडून आले पाहिजेत, आम्हाला जगनमोहन हवे आहेत, असा याचा अर्थ. आंध्र प्रदेशमध्ये काढलेली ही 3 हजार किलोमीटरची पदयात्रा जगनमोहन यांना यश देऊन गेली आणि चंद्राबाबू नायडूंच्या सत्ताधारी तेलगु देसम पक्षाला पराभव पत्करावा लागला. गेल्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांचा पराभव झाला होता. त्यांना 175 जागांपैकी 67 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आता मात्र त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे.

जगनमोहन रेड्डी यांचे वडील वायएसआर रे़ड्डी हे आंध्र प्रदेशचे अत्यंत प्रभावी नेते होते. वायएसआर रेड्डी यांनीही शेतकऱ्यांसाठी 1600 किलोमीटरची पदयात्रा काढून आंध्र प्रदेशमधल्या ग्रामीण भागावर आपली पक़ड मजबूत केली होती. वायएसआर रेड्डी यांच्या निधनानंतर एक वर्षाने म्हणजे 2010 मध्ये जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि वायएसआर रेड्डी यांच्या नावाने वायएसआर काँग्रेसची स्थापना केली. आता आंध्र प्रदेशमध्ये त्यांच्या पक्षाचं सरकार येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: YSR Congress chief YS Jagan emerges big winner in both LS and assembly polls