Election Results : नांदेडच्या बालाजीने राणांसाठी नवस बोलला अन् फेडलाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

"मी नवनीत राणा साठी नवस केला होता ते गेल्या वेळी पण निवडणुकीत पडल्या होत्या या वेळी तरी त्यांनी निवडून यावे म्हणून सत्य गणपती बाप्पाला नवस करतो म्हणलो होतो आणि मी सहज म्हणलो होतो आता घरचे म्हणत आहेत नवस करू नाय केला तो फेडला पाहिजे" असेही बालाजी हेंद्रे यांनी सांगितले आहे.

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. मात्र, अमरावती लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी शिवसनेचे दिग्गज नेते आनंदराव आडसून यांचा पराभव केला. 

लोकसभा निवडणुकीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. पण, नवनीत कौर राणा यांचा चाहता असलेल्या एका नांदेडमधील अर्धापूरमधील बालाजी हेंद्रे नावाच्या व्यक्तीने राणा निवडून याव्यात नांदेडजवळील सत्यगणपतीला महाआरती करण्याचा नवस बोलला होता. काल झालेल्या निकालानंतर राणा या निवडून आल्यानंतर त्यांनी आज (ता.24) रोजी महाआरती करून नवस फेडलाही. त्यांनी केलेला नवस सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

"मी नवनीत राणा साठी नवस केला होता ते गेल्या वेळी पण निवडणुकीत पडल्या होत्या या वेळी तरी त्यांनी निवडून यावे म्हणून सत्य गणपती बाप्पाला नवस करतो म्हणलो होतो आणि मी सहज म्हणलो होतो आता घरचे म्हणत आहेत नवस करू नाय केला तो फेडला पाहिजे" असेही बालाजी हेंद्रे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा 36951 मतांनी पराभव केला आहे. नवनीत कौर राणा यांना अमरावती मतदारसंघातून एकूण 510947 एवढी मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अडसूळ यांना एकूण 473996 एवढी मते मिळाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balaji Hendre Prays god for navneet rana to win election