Loksabha 2019 : बारामतीवर भाजपचे लक्ष केंद्रित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

बारामती शहर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघातील समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे, असे भाजपच्या सूत्रांकडून सांगितले गेले.

चंद्रकांत पाटील बारामतीत दर दोन दिवसांनी येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच प्रचाराची व्यूहरचनादेखील करणार आहेत. ३ एप्रिल रोजी बारामतीत भाजप व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली.

मोदींच्या सभेसाठी तयारी
बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपच्या कमळ या चिन्हावर लढणाऱ्या अधिकृत उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी १० किंवा ११ एप्रिल रोजी बारामतीत सभा घेणार आहेत. मोदी यांची बारामतीतील सभा जंगी व्हावी, या दृष्टीने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आजपासूनच तयारी सुरू झाली आहे. बारामतीच्या सभेला एक लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित राहावा, या दृष्टीने बारामतीत नियोजन सुरू झाले आहे. बारामतीची सभा ही भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असून, शरद पवार व सुप्रिया सुळे यांना थेट शह देण्याच्या रणनीतीचा हा एक भाग समजला जात आहे.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत नेमके काय बोलणार, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत देखील नरेंद्र मोदी यांनी बारामतीत सभा घेऊन ‘काका- पुतण्याची राज्य उलथवून टाका’ अशी हाक दिली होती. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. उलट अजित पवार हे विक्रमी मतांनी विजयी झाले. पंतप्रधानांच्या बारामतीच्या सभेचा नेमका काय परिणाम साधला जाणार, याबाबतही उत्सुकता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP focus on Baramati