Election Results: महाराष्ट्रातून 'या' तीन उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्य

Election Results: महाराष्ट्रातून 'या' तीन उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्य

लोकसभा निवडणुक 2019
मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ 81जागांवरच समाधान मानावे लागले. यामुळे देशात पुन्हा एकदा मोदींचीच सत्ता येणार आहे.

या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवल्यावर महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्य भारतीय जनता पक्षाच्या गोपाळ शेट्टींना मिळाले आहे. गोपाळ शेट्टींचा 453000 मतांनी विजय झाला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारंघातून गोपाळ शेट्टी यांना 706678 एवढी मते मिळाली आहेत, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उर्मिला मातोंडकर यांना केवळ 241431 एवढी मते मिळाली आहेत. या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीच्या सुनिल थोरात यांना मिळाली आहेत. या मतदारसंघात नोटालाही 11966 एवढी मते मिळाली आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य भाजपचे जळगांवचे उमेदवार उन्मेष पाटील (411617) यांना मिळाले असून तर तिसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे (335882) या निवडून आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com