Election Results : काँग्रेस राज्यात शून्यावर; लाजीरवाणा पराभव टाळणार का? 

गुरुवार, 23 मे 2019

भारतीय जनता पक्षाचा (भाजप) विजयरथ रोखून धरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रात अद्याप एकाही जागेवर आघाडी मिळविता आलेली नाही. सकाळी अकरापर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात काँग्रेसला विजयाची शून्य आशा आहे. 

लोकसभा निकाल 2019 : मुंबई : भारतीय जनता पक्षाचा (भाजप) विजयरथ रोखून धरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रात अद्याप एकाही जागेवर आघाडी मिळविता आलेली नाही. सकाळी अकरापर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात काँग्रेसला विजयाची शून्य आशा आहे. 

महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजप 24, शिवसेना 20, राष्ट्रवादी काँग्रेस तीन, तर वंचित बहुजन आघाडी एका जागेवर आघाडीवर आहे. राज्यात काँग्रेसच्या एकाही उमेदवाराला मतमोजणीच्या पहिल्या तीन तासांमध्ये आघाडी मिळविता आलेली नाही. गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला दोनच जागा मिळाल्या होत्या. अशोक चव्हाण आणि राजीव सातव यांना 2014 च्या निवडणुकीमध्ये विजय मिळविता आला होता. आता या दोन जागाही काँग्रेसच्या हातून निसटत चालल्या आहेत. 

देशभरातही काँग्रेसच्या अपेक्षांना जोरदार दणका बसला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी मोदी सरकारच सत्तेत असेल, असे सकाळी 11 पर्यंतचे चित्र आहे. 

ताज्या बातम्या आणि विश्‍वासार्ह निकालांसाठी डाऊनलोड करा 'सकाळ'चे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress is not leading on even a single seat until now in Loksabha 2019