ExitPolls 2019 : महाराष्ट्रात कोणाची सरशी; पाहा सर्व एक्झिट पोलचे अंदाज

ExitPolls 2019 : महाराष्ट्रात कोणाची सरशी; पाहा सर्व एक्झिट पोलचे अंदाज

एक्झिट पोल 2019 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला.

मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली. त्याप्रमाणे केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात सर्वाधिक जागा युतीलाच मिळतील, तर आघाडीनेही जोरदार लढत दिल्याचे चित्र आहे. सर्वच एक्झिट पोलमधून समोर आले आहे.

सर्वच पोलनी वर्तविलेल्या अंदाजानुसार शिवसेना-भाजपला फटका बसणार असून न्यूज 18 पोलच्या सर्वेक्षणानुसार वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही. न्यूज 18च्या सर्वेनुसार, वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही. तसेच या आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांना अकोला आणि सोलापूर या दोन्ही जागांवर पराभवाचा सामना करावा लागू शकतो. 

एबीपी-नेल्सन पोलच्या सर्वेक्षणानुसार शिवसेनेपेक्षा भाजपाला जास्त फटका बसणार असल्याचा अंदाज दिला आहे. एबीपी-नेल्सनच्या पोलनुसार, राज्यात महायुतीला 34 तर महाआघाडीला 14 जागा मिळतील. पक्षनिहाय अंदाजामध्ये भाजपा -17, शिवसेना - 17, काँग्रेस - 04, राष्ट्रवादी काँग्रेस -09, इतर -00 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वेळेच्या तुलनेत भाजपच्या जागा घटतील त्यांना शिवसेनेपेक्षा जास्त फटका बसेल तर शिवसेनेची एक जागा कमी होऊ शकते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जागांमध्ये दुप्पट वाढ होऊ शकते.

इंडिया टुडे-अॅक्सिस सर्वेक्षणानुसार राज्यात महायुती आघाडीवर राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इंडिया टुडे -अॅक्सिसच्या अंदाजानुसार, भाजपप्रणित महायुतीला 38 ते 42 जागा मिळतील तर काँग्रेसप्रणित आघाडीला 06 ते 10 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, सर्वच पोलनी दिलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत एनडीएच्या जागा घटणार असून ४८ लोकसभेच्या जागा असणाऱ्या महाराष्ट्रात भाजपसह एनडीएने गेल्यावेळी 42 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला 06 जागा मिळवता आल्या होत्या. मात्र, यंदाच्या पोलनुसार, एनडीएच्या जागा घटतील तर, युपीएच्या जागांमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com