Loksabha 2019 : पहिल्या टप्प्यात कुठे झाले किती मतदान?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

आज दिवसभर महाराष्ट्रात उन्हाचा पारा तापत असल्याने दुपारी 12 च्या आत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी बघायला मिळाली.

लोकसभा 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत आज गुरुवारी (ता. 11) मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. 

आज दिवसभर महाराष्ट्रात उन्हाचा पारा तापत असल्याने दुपारी 12 च्या आत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी बघायला मिळाली. तरी तापत्या उन्हाची तमा न बाळगता नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावला.

यवतमाळ जिल्ह्याचा पारा आज 42.5 अंशावर पोहोचला होता. पारी बारानंतर अनेक मतदान केंद्रावर शांतता होती. 

जाणून घेऊया आज लोकसभा निवडणूक 2019 च्या महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत कुठे झाले किती मतदान? 

  • नागपूर : 55 टक्के
  • यवतमाळ-वाशिम : 54 टक्के
  • गडचिरोली : 61 टक्के
  • वर्धा : 55.38 टक्के
  • रामटेक : 52 टक्के
  • भंडारा-गोंदिया : 60 टक्के
  • चंद्रपूर : 56 टक्के

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How many voting were done in the first phase of loksabha election in maharashtra