Loksabha 2019 : हुतात्म्यांबद्दल बोलताना भाजपला लाज वाटत नाही का?: राज ठाकरे (व्हिडिओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 एप्रिल 2019

हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबद्दल भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा आक्षेपार्ह वक्तव्य करतात आणि मोदी, शहा त्याचे समर्थन करतात. साध्वी प्रज्ञा सिंगर म्हणून कारागृहात गेल्या नव्हत्या. भाजपच्या मनात जवानांबद्दल काहीही आस्था नाही. आता ते जवानांच्या नावावर मते मागत आहेत, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

मुंबई : हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबद्दल भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा आक्षेपार्ह वक्तव्य करतात आणि मोदी, शहा त्याचे समर्थन करतात. साध्वी प्रज्ञा सिंगर म्हणून कारागृहात गेल्या नव्हत्या. भाजपच्या मनात जवानांबद्दल काहीही आस्था नाही. आता ते जवानांच्या नावावर मते मागत आहेत, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीनिमित्त राज ठाकरे यांनी साम वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मोदी, शहा यांच्यावर जोरदार टीका करत भाजपने राबविलेल्या धोरणांमुळे देशाचे कसे नुकसान झाले यावर भाष्य केले.

राज ठाकरे म्हणाले, की माझ टार्गेटच मोदी आणि शहा आहेत. जो माणूस दहशतवाद्यांच्या हातून मारला गेला, त्यावर भाजपचा उमेदवार म्हणतात माझ्या शापामुळे ते गेले. त्याचे समर्थन मोदी आणि शहा करत आहेत. साध्वी प्रज्ञा या स्फोटाच्या आरोपात कारागृहात होत्या. तुमच्यावर असलेल्या आरोपामुळे तुम्हाला तिच वागणूक मिळते. पंतप्रधान त्याचे समर्थन करत आहेत. पोलिसांबद्दल यांच्या मनात काय आहे, हे यातून दिसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Isnt BJP ashamed while talking about martyrs asks Raj