Election Results : महाराष्ट्रात कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

गुरुवार, 23 मे 2019

महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे-

आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी

 • माढा - संजय शिंदे
 • सोलापूर - सुशिल कुमार शिंदे
 • नांदेड - अशोक चव्हाण
 • औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
 • कोल्हापूर - संजय मंडलिक
 • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत
 • हातकणंगले - राजू शेट्टी
 • अमरावती - आनंदराव अडसूळ
 • शिरुर - अमोल कोल्हे
 • अहमदनगर - सुजय विखे
 • सातारा - उदयनराजे भोसले
 • बीड - प्रीतम मुंडे
 • नाशिक - हेमंत गोडसे
 • उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर
 • नागपूर - नितीन गडकरी
 • नंदुरबार - के.सी. पाडवी
 • भंडारा गोंदिया - सुनील मेंढे
 • बारामती - सुप्रिया सुळे
 • शिर्डी - लोखंडे (शिवसेना)

पिछाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी

 • नंदुरबार- हिना गावित (भाजपा)
 • भंडारा-गोंदिया- नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)
 • यवतमाळ-वाशिम    माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
 • नाशिक - समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
 • ठाणे - आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
 • नगर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
 • उस्मानाबाद - राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)
 • सोलापूर - प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)
 • सातारा - उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
 • मुळशी - पार्थ पवार (राष्ट्रवादी)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Maharashtra leading candidates