esakal | Loksabha 2019 : भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होणार
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

Loksabha 2019 : भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होणार

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (ता. 16) जाहीर होणार आहे. राज्य भाजप कोअर समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत काही नावांवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले असून, ही नावे दिल्लीत भाजप संसदीय मंडळाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर हे संसदीय मंडळ उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे.

या बैठकीत लोकसभा मतदारसंघाची तयारी करण्यासाठी स्थापन केलेल्या विविध समित्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच, भाजपच्या वाट्याला आलेल्या 25 जागांपैकी सुमारे 20 जागांवर एकमत झाले असून, विद्यमान खासदारांच्या नावांची शिफारस संसदीय मंडळाला करण्याचे निश्‍चित झाले आहे. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.

loading image