Loksabha 2019 : खड्ड्यात गेला कायदा; आचारसंहितेचेही बघून घेऊ - संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 एप्रिल 2019

खड्ड्यात गेला कायदा, आचारसंहितेचे काय करायचे तेही आम्ही बघून घेऊ, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - खड्ड्यात गेला कायदा, आचारसंहितेचे काय करायचे तेही आम्ही बघून घेऊ, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. 

रविवारी एका सभेत बोलताना राऊत यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाल्याची चर्चा आहे. प्रचारसभेत आचारसंहितेबद्दल बोलताना राऊत म्हणाले, ‘‘निवडणुकीचे वातावरण असल्याने सातत्याने आचारसंहितेची भीती दाखवली जाते, त्यामुळे माझ्या मनात आचारसंहितेबद्दल कायम एक भीती असते. मात्र, आम्ही कायदा वगैरे मानणाऱ्यांपैकी नाही. त्यात आम्हाला सतत ‘आचारसंहिता आहे, आचारसंहिता आहे’ असे सांगितले जाते. जी गोष्ट आमच्या मनात आहे, हृदयात आहे, ती आम्ही बाहेर नाही काढली तर गुदमरल्यासारखे होते. त्यामुळे खड्ड्यात गेला कायदा आणि आचारसंहितेचेही आम्ही बघून घेऊ, असे विधान राऊत हे करत असलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी योगी आदित्यनाथ यांच्यावर तीन दिवसांची, तर बसपच्या मायावती यांच्यावर दोन दिवसांची प्रचारबंदी निवडणूक आयोगाने लागू केली आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Law Code of Conduct Sanjay Raut