Loksabha 2019 : ‘मोदी लोकशाहीचा गळा घोटतील’ - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

बीडमध्ये मुक्काम अन्‌ खलबते
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ दोन सभा घेऊन बीडमध्ये मुक्कामही केला. दोन सभांमधील वेळ तसेच मुक्कामाच्या रविवारच्या रात्री आणि सोमवारी सकाळीही नेत्यांसोबत खलबते झाली. वातावरण चांगले असून, संधीचे सोने करण्यासाठी जोर लावण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या.

परतूर (जि. जालना) - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता देणे म्हणजे स्वतःच्या हाताने लोकशाहीचा गळा कापल्यासारखे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले.

परभणी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ परतूर येथील सभेत सोमवारी (ता. १५) ते बोलत होते. 

पवार म्हणाले, की खाणारा जर जगवायचा असेल तर आधी धान्य पिकविणारा जगविला पाहिजे. मात्र, सरकारकडून शेतकरी व सामान्य नागरिक यांना संपविण्याचे सातत्याने पाच वर्षे प्रयत्न करण्यात आले. हुकूमशाहीच्या दिशेने या सरकारची वाटचाल सुरू झाली. या वर्षी जर सत्ता मोदींच्या हातात दिली, तर पुढच्या काळात निश्‍चितच लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुका होणार नाहीत. 

एक चौकीदार आहे, तर बाकी सगळे थकबाकीदार झाल्याचे चित्र पूर्ण देशात निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीने तरुण उमेदवार दिले आहेत. त्यांना निवडून देण्याचे काम आता जनतेने करायचे आहे, असे आवाहन पवार यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Democracy Sharad Pawar Politics