Loksabha 2019 : मोदींच्या हाती देश सुरक्षित - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

देशद्रोह्यांना व पाकिस्तानला चोख प्रत्युतर देत देशाचा स्वाभिमान जपण्याचे काम मोदींनी केले. त्यामुळे विरोधकांकडे बोलण्यासाठी कोणतेच मुद्दे नाहीत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

सातारा - ही निवडणूक विकासाच्या मुद्यांबरोबरच राष्ट्रीय अस्मितेची आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हे ठरवणारी आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आहे. देश टिकला पहिजे. त्यासाठी धनुष्यबाण मोदींच्या हातात द्या. याच धनुष्यबाणाच्या साह्याने ते देशद्रोही संपवतील, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले. 

उदयनराजे सध्या सांगत असलेल्या एका तरी कामाला त्यांच्या सत्तेच्या काळात निधी मिळाला का हे त्यांनी सांगावे, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी दिले. महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आज येथील गांधी मैदानावर फडणवीस यांची जाहीर सभा झाली. 

फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करणारा नेता मिळाला आहे. जनधन, उज्ज्वला, स्वच्छ भारत अभियान, सर्वांसाठी घरे, शेतकरी सन्मान अशा विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाला थेट लाभ देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. उसाला गेल्या चार वर्षांत सर्वाधिक एफआरपी मिळाली. मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळेच चांगला दर मिळणे शक्‍य झाले आहे. मोदी हे विरोधकांना संताजी-धनाजीप्रमाणे पाण्यात दिसत आहेत. देश टिकाला पहिजे, यासाठीची ही निवडणूक आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी धनुष्यबाणाच्या चिन्हाचे बटन दाबून नरेंद्र पाटील यांना विजयी करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi India Secure Devendra Fadnavis Politics