Loksabha 2019 : ‘राष्ट्रवादी’मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 23 March 2019

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या सर्वाधिक उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात युवा नेत्यांचाही समावेश असल्याने या सर्व मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरणार असल्याचे मानले जाते. आतापर्यंत पक्षातील बुजुर्ग व अनुभवी नेत्यांना लोकसभेवर पाठवण्याचा जो ट्रेन्ड होता, त्याला ‘राष्ट्रवादी’ने पहिल्यांदाच बाजूला करत अगदी नवख्या, पण सक्षम चेहऱ्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. 

त्यात गुलाबराव पाटील (जळगाव), कुणाल पाटील (धुळे), धनराज महाले (दिंडोरी), संग्राम जगताप (नगर दक्षिण), राणा जगजितसिंह पाटील (उस्मानाबाद), संजय शिंदे (माढा), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), पार्थ पवार (मावळ), राजेश विटेकर (परभणी) यांचा समावेश आहे. हे सर्व उमेदवार पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत. यापैकी गुलाबराव पाटील सर्वांत ज्येष्ठ उमेदवार आहेत; तर राणा जगजितसिंह व संग्राम जगताप यांनी आमदार म्हणून याअगोदर विजयी लढत दिली आहे. 

या नव्या चेहऱ्यांना थेट लोकसभेची उमेदवारी देताना वाढता युवा वर्ग व दिल्लीतल्या बदलत्या राजकीय परिस्थितीकडे पाहून उमेदवारी दिल्याचे सांगितले जाते. इतर उमेदवारांत समीर भुजबळ (नाशिक), सुनील तटकरे (रायगड), उदयनराजे भोसले (सातारा), सुप्रिया सुळे (बारामती) व धनंजय महाडिक (कोल्हापूर) यांनी या अगोदर लोकसभा निवडणूक लढविली होती. यापैकी समीर भुजबळ व सुनील तटकरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 NCP New Candidate Politics