Loksabha 2019 : प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीवर टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघातून भाजपने मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केल्यावर गीतकार जावेद अख्तर यांनी टीका केली आहे.

मुंबई - मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघातून भाजपने मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केल्यावर गीतकार जावेद अख्तर यांनी टीका केली आहे.

साध्वी प्रज्ञा यांना हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जाते. भोपाळ मतदारसंघात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कॉंग्रेस उमेदवार दिग्विजयसिंह यांच्याविरुद्ध निवडणूक लढणार आहेत. यादरम्यान विचारवंत आणि प्रसिद्ध गीतकार - लेखक जावेद अख्तर यांनी भाजपाद्वारे प्रज्ञा ठाकूर हिला उमेदवारी देण्यावर "वाह...वाह...वाह' म्हणत भाजपच्या नीती-धोरणांवर टिप्पणी केली. "भोपाळमध्ये भाजप उमेदवाराची निवड खरोखरंच दोषरहित आहे. साध्वी प्रज्ञा, संघ परिवाराच्या विचारांसाठी आणि कार्यांसाठी अगदी योग्य व्यक्ती आहे. "वाह...वाह...वाह', असे आपल्या ट्‌विटमध्ये म्हणत जावेद अख्तर यांनी टीका केली. दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांनी बुधवारी कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजयसिंह यांच्यावर सनातन धर्माला अपमानित करण्याचा आरोप केला. आपण भगव्याला सन्मान मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Pragya Singh Candidate Politics Comment