Loksabha 2019 : मोदींच्या उपस्थितीत विखे भाजपमध्ये?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नगरमध्ये होणाऱ्या सभेत ते प्रवेश करणार असल्याची चर्चा भाजप प्रदेश कार्यालयात सुरू आहे.

मुंबई - विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नगरमध्ये होणाऱ्या सभेत ते प्रवेश करणार असल्याची चर्चा भाजप प्रदेश कार्यालयात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते भाजपच्या गोटात सामील होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधील काही नाराज आमदारांना घेऊन विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सुरवातीला चर्चा होती. मात्र, भाजपच्या विरोधात तयार झालेल्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर विखे यांच्यासोबत कोण भाजपात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच विखे पाटील यांचा प्रवेश लवकर व्हावा, म्हणून भाजपकडून दबाव आहे. पण, काँग्रेसमधील नाराज आमदार २३ मेपर्यंत थांबवण्याची भूमिका घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Radhakrishna Vikhe Patil BJP Politics Narendra Modi