esakal | Loksabha 2019 : ‘लाव रे तो व्हिडिओ’चा सोशल मीडियावर धुमाकूळ
sakal

बोलून बातमी शोधा

Raj-Thackeray

प्रचाराच्या ‘स्टाइल’ला पसंती
नेटकऱ्यांनी आता याच ‘लाव रे तो व्हिडिओ’बद्दल सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या आहेत. अनेकांनी राज यांच्या प्रचाराची ही ‘स्टाइल’ आवडल्याचे म्हटले आहे. तर काहींनी या व्हिडिओचा आता विरोधकांनी धसका घेतल्याचे मत मांडले आहे. ट्विटर तसेच फेसबुकवर ‘लाव रे तो व्हिडिओ’, ‘जाळ अन धूर संगटच’ नावाने अनेक पोस्ट करण्यात आल्या असून हे चार शब्द सध्या नेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

Loksabha 2019 : ‘लाव रे तो व्हिडिओ’चा सोशल मीडियावर धुमाकूळ

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - जेवढा प्रतिसाद ‘मैं भी चौकीदार’ घोषणेला अख्ख्या देशात मिळाला नसेल तेवढा प्रतिसाद राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ला मिळत असल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे. या ट्‌विटर युद्धावरून अनेकांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही आठवड्यांपूर्वीच त्यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. मात्र आपण पंतप्रधान मोदी आणि भाजपविरुद्ध प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी मागील आठवडाभरापासून महाराष्ट्रातील काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत. नांदेड येथील सभेपासूनच राज्यभरात राज यांच्या दौऱ्याची चर्चा चांगलीच रंगली. 

पहिल्याच सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या विधानांचे व्हिडिओ दाखवून त्यांनी दिलेली आश्‍वासने किती फसवी आहेत, यासंदर्भात भाषणातून जोरदार टीका केली. पुराव्यांसह राज यांनी केलेले हे ‘स्मार्ट’ भाषण नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस पडले. त्यानंतरच्या दोन्ही सभांमध्येही त्यांनी व्हिडिओचा वापर करून सरकारवर घणाघाती टीकास्त्र सोडले. याच व्हिडिओचा धसका आता विरोधकांनी घेतल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 

सभांमध्ये हे व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवायला सांगताना राज ठाकरे तांत्रिक बाब सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणताना दिसतात.

loading image