Loksabha 2019 : शरद पवार यांना बारामतीत थांबू दिले नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी मतदानाच्या दिवशी बारामतीत थांबण्यास मज्जाव केल्यामुळे त्यांना मुंबईत परतावे लागले आहे. शरद पवार यांचे बारामतीत मतदान नाही.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी मतदानाच्या दिवशी बारामतीत थांबण्यास मज्जाव केल्यामुळे त्यांना मुंबईत परतावे लागले आहे. शरद पवार यांचे बारामतीत मतदान नाही.

मुंबईच्या मतदार यादीमध्ये त्यांचे नाव असल्याने त्यांना बारामतीत थांबू देऊ नका, अशी तक्रार भाजपच्या वतीने करण्यात आली होती. 

शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान व भाजप आचारसंहितेला सर्रास हरताळ फासत असताना मी मात्र आचारसंहितेचे पालन केले. मी बारामतीचा मतदार नसलो तरी माझे घर तिथे आहे. मी तिथे थांबू शकत होतो. मी मतदानाच्या दिवशी बाहेर फिरण्याऐवजी माझ्या घरात थांबलो असतो; पण आचारसंहितेचा भंग नको म्हणून मी आग्रह धरला नाही. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी नियम धाब्यावर बसवून मतदानाला गेल्यानंतर ‘रोड शो’ करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Sharad Pawar Baramati Politics BJP