Loksabha 2019 : शब्द पाळला नसता, तर गर्दी नसती - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

काम करणारे करतात, न करणारे ओरडतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्याचं दुकान काढलंय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा, भावाकडे एक झेंडा, पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय. आम्ही कोकणला जो शब्द दिला तो पाळला नसता, तर आज हा विराट जनसमुदाय दिसला नसता, असे उद्‌गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले.

देवरुख - काम करणारे करतात, न करणारे ओरडतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्याचं दुकान काढलंय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा, भावाकडे एक झेंडा, पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय. आम्ही कोकणला जो शब्द दिला तो पाळला नसता, तर आज हा विराट जनसमुदाय दिसला नसता, असे उद्‌गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले.

महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ देवरुखातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील पटांगणावर आज उद्धव ठाकरे यांची सभा झाली, त्या वेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, मागील वेळी विनायक राऊत निवडून आल्यावर कोकणवासीयांना धन्यवाद देण्यासाठी मी आलो होतो. या मतदारसंघाला बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते, सुरेश प्रभू यांसारख्या दिग्गज खासदारांची परंपरा आहे. २००९ ला ती खंडित झाली. मात्र, युतीच्या कार्यकर्त्यांनी ती कसर मागील वेळी भरून काढली. या वेळीही तीच परंपरा कायम ठेवायची आहे. आम्ही कोकणात विकासकामे केली आणि समोरचा विचारतोय काय विकास केलात? ज्याला ही विकासकामे दिसत नसतील, तोच निवडणुकीनंतर दिसेनासा होईल. या निवडणुकीत महाराष्ट्रात ३६-४० नव्हे; तर महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतून महायुतीचे खासदार विजयी करण्याची आज शपथ घेऊया, असेही आवाहन ठाकरे यांनी या वेळी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Uddhav Thackeray Speech Politics